केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौ लोकसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. राजनाथ सिंह हे लखनौतून दुसऱ्यांदा लोकसभेसाठी रिंगणात आहेत.
पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम यांनी मंगळवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पूनम यांना लखनौमध्ये सपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेसने लखनौतून आचार्च प्रमोद कृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली.
मध्य प्रदेशातील इंदूरमधून काँग्रेसने पंकज संघवी यांना उमेदवारी दिली आहे.