पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीने गर्भवती पत्नीवर पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ऑनलाइन क्लिपमध्ये मी ज्या महिलेला पाहिले ती माझी पत्नीच होती असा त्याचा दावा असून आपले म्हणणे खरे करण्यासाठी त्याने गर्भवती पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये येण्यास भाग पाडले. पॉर्न क्लिपमध्ये दिसणारी महिला तुमची पत्नी नाही हे सायबर गुन्हे शाखेतील पोलिसांनी त्या माणसाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचे काहीही ऐकायला तयार नसून मानसिक उपचार घेण्यासही त्याने नकार दिला आहे.

नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे अखेर पत्नी नवऱ्याचे घर सोडून आंध्र प्रदेशमध्ये माहेरी निघून गेली. पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती आहे. त्यांच्या लग्नाला सहावर्ष झाली असून ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. पती पॉर्नच्या आहारी गेला असून तो पत्नीवर संशय घेत होता. मागच्या महिन्यात त्याने एक पॉर्न व्हिडिओ बघितला त्यातील महिलेला पाहून सदर महिला म्हणजे आपली पत्नीच आहे असा त्याने समज करुन घेतला.

त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. आपले म्हणणे खरे करण्यासाठी त्याने पत्नीला पोलीस स्टेशनची पायरी चढण्यास भाग पाडले. पोलिसांनी या जोडप्याला वनिता सहायवानी या हेल्पलाइनकडे समुदपदेशनासाठी पाठवले. तिथेही हा माणूस आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. अखेर पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाची मदत घेण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायबर क्राईम विभागातील पोलिसांनी सुद्धा व्हिडिओमध्ये दिसणारी महिला तुमची पत्नी नाही हे त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. भारताबाहेरुन ही क्लिप अपलोड करण्यात आल्याचे त्याला सांगितले. पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. तो व्हिडिओमधील पुरुषाला शोधून काढण्याची मागणी करत होता.