प्रजासत्ताक दिनी भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती रिसर्च अँड अॅनेलेसिस विंग अर्थात ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. यासाठी भारतातून फरार झालेला मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक हा एका नव्या दहशतवादी संघटनेला पैसा पुरवत आहे, असं ‘रॉ’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृत्तानुसार, पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टर इस्लामिक संघटनेने या स्फोटांचा कट रचला असून काही रोहिंग्यांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमध्ये हे स्फोट घडवले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२१ पूर्वी हे हल्ले होण्याची शक्यता असल्याचंही यात म्हटलं आहे. दिल्ली, अयोध्या, बोधगया, श्रीनगर, चंदीगड आणि पश्चिम बंगालमधील महत्वाचं शहर यांना यासाठी टार्गेट करण्यात येणार आहे.

दरम्यान, मलेशियास्थित रोहिंग्यांच्या गटाला यासाठी आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. दोन लाख अमेरिकन डॉलर इतका पैसा यासाठी पुरवण्यात आल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. झाकिर नाईक आणि मलेशियातील रोहिंग्यांचा नेता मोहम्मद नसीर यांनी हे कारस्थान रचलं आहे. चेन्नईतील एका व्यक्तीला यासाठी परदेशातून पैसाही मिळाला आहे. म्यानमारमध्ये यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिला हे हल्ले घडवून आणतील त्या महिला नेपाळ आणि बांगलादेशातून भारतात प्रवेश करतील, असंही ‘रॉ’ने आपल्या अहवालात म्हटल्याचं वृत्त टाइम्सनं दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of assassination on republic day connection with zakir naik intelligence burrow information aau
First published on: 14-12-2020 at 22:01 IST