नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करोना लसीकरणाबाबत टीका करणारी पत्रके चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक केली आहे. भित्तिपत्रकांत ‘मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दिया’ असे म्हटले होते.

मोदी यांच्या विरोधातील  भित्तिपत्रके शहरात अनेक ठिकाणी चिकटवण्यात आली होती. भादंवि १८८ तसेच मालमत्ता विद्रुपीकरणविरोधी कायद्यानुसारही  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आणखी गुन्हे दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.  चौकशी सुरू असून कुणाच्या वतीने ही भित्तिपत्रके चिकटवण्यात आली याचा शोध घेतला जात आहे.  त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.