धवल कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना व्हायरसच्या संकटामुळे सगळं जग हादरलं आहे. अशात सोशल मीडिया वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या अशास्त्रीय  माहितीमुळे चिकन आणि इतर कुक्कुट उत्पादनांच्या सेवनावर परिणाम झाला आहे. हा रोग चिकन आणि कोंबड्यांच्या उत्पादनांमधून पसर असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावरुन प्रसारित होते आहे. या माहितीचा मोठा फटका पोल्ट्री उद्यागाला बसला आहे. महाराष्ट्रात हा उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र करोनाचा परिणाम झाल्याने एक महिन्याच्या कालावधीत  पोल्ट्री उद्योगातील विक्री १२०० मेट्रिक टन इतकी उतरली आहे. त्याचबरोबर मागणी उतरल्याने दरामध्ये घसरण सुद्धा लक्षणीय आहे.

महाराष्ट्र हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशातील काही अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. सन २०१९ च्या विसाव्या पशू गणनेनुसार राज्यांमध्ये एकूण कुकुट संख्या सात कोटी ४२ लाख इतकी आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात वाढवण्यात येणाऱ्या अंड्यावरील व माणसाला पक्ष्यांची संख्या पाच कोटी ६ लाख इतकी असून परसातील कुक्कुट पक्ष्यांची संख्या २ कोटी २१ लाख एवढी आढळून आली आहे करोना व्हायरस बाबतची चुकीची माहिती प्रसारित केल्यामुळे अंडी आणि चिकन मागणी कमी झाली असून त्याचा परिणाम किमतीवर देखील झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडील अंड्यांची सरासरी विक्री म्हणजेच फार्म gate प्राईस दिनांक १ जानेवारी २०२० रोजी चार रुपये ६७ पैसे प्रति अंडी होती आणि त्यात एक फेब्रुवारी रोजी घसरण होऊन ती तीन रुपये ६७ पैसे इतकी झाली. मात्र ११ मार्च रोजी त्यांची किंमत ही फक्त दोन रुपये ९५ पैसे एवढी कमी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच राज्यातील मंसाल पक्ष्यांची विक्री दिनांक १ फेब्रुवारी रोजी ३४१४.२६ मेट्रिक टन इतकी होती आणि त्याची किंमत ही सरासरी रुपये ७०.८४ प्रतिकिलो एवढी होती मात्र ९ मार्च रोजी ही विक्री फक्त २१३७.२६  मेट्रिक टन इतकी असून किंमत फक्त रुपये १५.२५ प्रति किलो एवढी झाली आहे.

या बसलेल्या मागणीचं आणि किमतींचा परिणाम हा नुकताच पोल्ट्री इंडस्ट्रीवर झाला नसून या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या मका व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यावर, मजुरावर, आणि वाहतूक व्यावसायिकावर सुद्धा जागा आहे.

संघटित क्षेत्रांमध्ये अंड्यावरील पक्षी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची राष्ट्रीय अंडी समन्वय समिती म्हणजेच नॅशनल egg coordination कमिटी ही संस्था दैनंदिन बाजारातील अंड्यांचे दर ठरवण्याचे काम करते तर माणसाला पक्षी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोल्ट्री farmers अँड breeders असोसिएशन ही संस्था बाजारातील पक्षाच्या विक्रीबाबत आणि सरासरी दराबाबत माहिती ठेवते. शासनाने ही माहिती या दोन्ही सदर संस्थांकडून उपलब्ध करून घेतली आहे.

धवल कुलकर्णी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poultry business in trouble because of corona virus dhk
First published on: 13-03-2020 at 16:27 IST