वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांनी वीजदर वाढवून देण्याची मागणी केली असून त्यावर विद्युत नियामक आयोग विचार करीत असल्यामुळे राजधानीतील वीजदर वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
यासंदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे दिल्ली विद्युत मंडळाचे अध्यक्ष पी.डी.सुधाकर यांनी सांगितले. ऊर्जा खरेदी किंमतीची जुळवाजुळव करण्यासाठी खासगी विद्युत पुरवठा कंपन्यांनी वीजदरात वाढ करण्यासाठी मागणी केली आहे. रिलायन्स इन्फ्राच्या अधिपत्याखालील बीएसईएसने १३ टक्के तर टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन लिमिटेडने १४ टक्के दरवाढीची मागणी केली आहे.