लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रज्ज्वल रेवण्णा कथित सेक्स स्कँडल आणि २९७२ क्लिप असलेल्या पेन ड्राईव्हमुळे अडचणींत आले आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. हे प्रकरण उघडकीस येताच त्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अशातच आता प्रज्ज्वल रेवण्णांची या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सेक्स स्कँडल प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच.डी. रेवण्णांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच चौकशीसाठी उपस्थित राहण्यासंबंधी समन्स बजावण्यात आलं आहे. यानंतर सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर प्रज्ज्वल रेवण्णांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय आहे प्रज्ज्वल रेवण्णांची पोस्ट?

“Truth will prevail soon” म्हणजेच सत्य लवकरच सगळ्यांना समजेल अशी एका ओळीची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी बंगळुरुमध्ये नाही. त्यामुळे मी चौकशीला सामोरं कसं जाणार? मी यासंदर्भात माझ्या वकिलामार्फत सीआयडीशी संपर्कही साधला आहे. ” त्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर ही ओळ लिहिली आहे. हे सगळं प्रकरण घडल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णांनी जर्मनीला पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जो प्रकार समोर आला त्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले होते.

सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर निलंबनाची कारवाई; जेडीएस पक्षाचा निर्णय

कोण आहेत प्रज्वल रेवण्णा?

प्रज्ज्वल रेवण्णा हे देवेगौडा कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे नेते आहेत. कर्नाटकचे पाटबंधारे विभागाचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे ते पुत्र आहेत. एच. डी. रेवण्णा आणि एच. डी. कुमारस्वामी हे दोघं भाऊ आहेत. त्यामुळे कुमारस्वामी हे प्रज्ज्वल रेवण्णांचे काका आहेत.

प्रज्ज्वल रेवण्णांनी बंगळुरुतल्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेडिकल इंजिनिअरिंग केलं आहे. राजकारणातही ते सक्रिय आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

JDS या पक्षाचे सचिव म्हणून प्रज्ज्वल रेवण्णांची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली. आता त्यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत.