शरद पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत. पवार आणि राहुल गांधी यांनी त्यांची जात कधी काढली का? त्यांच्या तोंडून कधी ऐकलं का? केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पार्थ पवार आणि बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली.

अजित पवार म्हणाले, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कधी सांगितलंय की देशाला दोन पंतप्रधान देणार,कधीच सांगितलं नाही..आणि हे खुशाल सांगतात देशाला दोन पंतप्रधान देणार…कोणी सांगितलंय सांगा असे पवार म्हणाले. मोदी म्हणतात माझी जात काढली यांची कोणी जात काढली हे त्यांनी सांगायला पाहिजे. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या तोंडून ऐकलं का? तर नाही ऐकलं. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत.

गांधी, नेहरू आणि पवार परिवारावर उतरून देशाच्या कोट्यवधी जनतेचे प्रश्न सुटणार आहेत नाहीत. १५ लाख का दिले नाहीत,दोन कोटी नोकऱ्या,परदेशातील काळा पैसा, शेतकऱ्यांना न्याय का दिला नाही ते सांगा, आरक्षण दिलं गेलं नाही असे अनेक प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. देशाला भाजपा सरकारने कर्जात लोटल आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर केलाय. त्याच्या बद्दल बोलायला कोणी तयार नाही.

पुलवामाच्या बाबतीत सांगतात की जे जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली म्हणून भाजपाला मतदान करा…वाह रे पंतप्रधान जवान भारताचे आहेत भाजपाचे नाहीत. जवान कोणामुळे शाहिद झाले तुमच्या नाकारते पणामुळे, ३०० किलो आरडिक्स आलं कस,गुप्तचर यंत्रणा काय करत होती? तुम्ही काय करत होता. याच उत्तर १३५ कोटी जनतेला द्यायला हवं असं पवार म्हणाले. उलट स्वतः च्या चुका झाकण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने मत मागत आहात. शाहिद हेमंत करकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. त्यामुळे देशाला आणि राज्याला कुठल्या दिशेला घेऊन जात आहात. युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले यांचे विचार कुठे आणि तुमचे विचार कुठे याचा विचार झाला पाहिजे असा टोला पवार यांनी लगावला.