प्रियांका गांधी यांच्यावर सोमवारी नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. रुग्णालयातर्फे यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रुग्णालयात जाऊन प्रियांकाच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे राहुल गांधी यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना पत्रकारांना सांगितले. मात्र, शस्त्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2013 रोजी प्रकाशित
प्रियांका गांधींवर छोटी शस्त्रक्रिया
प्रियांका गांधी यांच्यावर सोमवारी नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

First published on: 04-03-2013 at 04:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi undergoes surgery