समुद्र किनाऱ्यांवरील कचऱ्याची समस्या गंभीर!

करोनामुळे सध्या प्रशासनावर प्रचंड ताण आहे.

उच्च न्यायालयाकडून चिंता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पाऊस व विशेषकरून ‘तौक्ते’ वादळानंतर राज्यातील सगळ्याच किनारपट्ट्यांवर समुद्रातून फेकल्या गेलेल्या कचऱ्याने निर्माण झालेल्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी चिंता व्यक्त केली. करोनामुळे सध्या प्रशासनावर प्रचंड ताण आहे. परंतु समुद्रातून पुन्हा किनाऱ्यांवर फे कल्या गेलेल्या कचऱ्यामुळे गंभीर पर्यावरणीय प्रशद्ब्रा निर्माण झाला असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.  तसेच या प्रशद्ब्री शुक्र वारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पालिकेला दिले.

‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर समुद्रातील कचरा किनाऱ्यांवर फेकला गेला. त्यामुळे बहुतांश किनाऱ्यांवर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्याच्या वृत्ताची मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Problem of beach litter is serious akp