कृषी कायदे मागे घेतल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंजाब दौऱ्यावर गेले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला परतावं लागलं. पंतप्रधान मोदी आंदोलनकर्त्यांमुळे पंजाबमधल्या एका फ्लायओव्हरवर सर्व सुरक्षा आणि गाड्यांच्या ताफ्यासह जवळपास १५ ते २० मिनिटे अडकून पडले होते. त्यानंतर या मुद्द्यावरून देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने सभेला गर्दी न झाल्याने मोदी परतल्याचे म्हटले आहे तर भाजपाने हे षडयंत्र असल्याचे म्हटल आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेसचे नेते ज्या बेशरमीने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भात वक्तव्ये करत आहेत हा निर्लज्जेतेचा कळस आहे. इतक्या जुन्या पक्षाचे लोक देशहिताचा विचार सोडून इतका अपरिपक्व विचार करु शकतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो. करोडो लोकांचे आशिर्वाद पंतप्रधान मोदींसोबत आहेत. या आशिर्वादानेच ते लोकांची सेवा करत आहेत आणि यामुळेच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण मोदींबद्दल वाईट विचार करणारे असे लोक आहेत त्यांच्याकडून भारतीय जनात हिशोब मागणार आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

“मोदीजी, हाउज द जोश?”; पंजाबमध्ये आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा रोखल्यानंतर काँग्रेस नेत्याचे ट्विट

“सोशल मीडीयावर काही येते ते खरे असते का? भाजपाचे कार्यकर्ते मोदींना कशाला अडवणार? आयत्या वेळी मार्ग बदलण्यात आलेला नाही. मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गाबाबत पंजाब पोलिसांनी स्पष्टता दिली होती. त्यानंतर ताफा पुढे गेला. यापूर्वीही पंजाबमध्ये ८०च्या दशकात काँग्रेसने हाच खेळ केला होता आणि पंजाबला याचा परिणाम वर्षानुवर्षे भोगावे लागले. तोच खेळ सत्तेच्या पाठीमागे लागून काँग्रेस पुन्हा करत आहे आणि हे देशहिताचे नाही. आंदोलनकर्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते याचा खुलासा झाला आहे. काँग्रेसचा चेहरा उघडा पडल्यानंतर ज्या प्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आंदोलनाची माहिती असतानाही ‘ब्लू बुक’च्या नियमांचे पालन नाही; पंजाब पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप

दरम्यान, पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत आधीच गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती, पण असे असतानाही त्यांनी ‘ब्लू बुक’चे नियम पाळले नाहीत तसेच तसेच दुसऱ्या मार्गाची तयारीही केली नाही, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण तापल्यानंतर गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या ब्लू बुकमध्ये म्हणजेच एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesters were congress workers devendra fadnavis claims abn
First published on: 06-01-2022 at 14:37 IST