FATF Report on Pulwama Attack : पुलवामा येथे २०१९ मध्ये आणि गोरखनाथ मंदिरात एप्रिल २०२२ मध्ये रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसेस, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने मंगळवारी यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तसेच या अहवालात म्हटले आहे की, सोशल मिडिया, मेसेजिंग अॅप आणि क्राउडफंडिंग साइट्स यासारख्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात दहशतवादाला पैसा पुरवण्यासाठी गैरवापर केला जात आहे.

FATF च्या अहवालात कोणत्याही देशाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तरी यामध्ये नमूद केले आहे की दहशतवादासाठी वित्तपुरवठ्यासाठी ‘स्टेट स्पॉन्सरशिप’चा वापर एकतर पैसा उभारण्याचे तंत्र म्हणून किंवा दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या विशिष्ट संघटनांच्या आर्थिक व्यवस्थापन धोरणाचा भाग म्हणून केल्याबद्दल त्यांच्या डेलिगेशनकडून अहवाल मिळाले आहेत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीचे स्त्रोत आणि डेलिगेशनने रिपोर्टमध्ये दिलेल्या इनपुट्सनुसार असे सूचित होते की, काही ठराविक दहशतवादी संघटनांना गेल्या काही काळापासून आर्थिक आणि इतर माध्यमातून अनेक देशांच्या सरकारांकडून पाठिंबा मिळला आणि तो आताही मिळणे सुरू आहे.

“अनेक प्रकारचा पाठिंबा दिल्याचे नोंदवण्यात आल आहे. ज्यामध्ये थेट आर्थिक पाठिंबा, लॉजिस्टिक आणि मटेरियल सपोर्ट, किंवा प्रशिक्षण पुरवणे याचा समावेश आहे. डेलिगेशनने नोंदवले की, दहशतवादी वित्त पुरवठ्यासाठी स्टेट स्पॉन्सरशिप ही सँग्शन्स सर्क्युंव्हेशन टेकनिक्स (sanctions circumvention techniques)च्या माध्यमातून व्यापर आणि तस्करी यंत्रणांशी जोडण्यात आली, ज्यामध्ये राष्ट्रीय सरकारने कथितपणे सहाय्यक भूमिका बजावली, असे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह अपडेट ऑन टेररिस्ट फायनान्शियल रिस्क्स (Comprehensive Update on Terrorist Financing Risks’, या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

यासाटी अनेक प्रकारच्या मालाची विक्री झाल्याचा देखील माहिती यामध्ये देण्यात आली आहे. जसे की एका मध्यस्थ देशात सोन्याच्या बदल्यात विकण्यासाठी जहाजाने तेल पाठवण्यात आले, नंतर हे सोने दुसर्‍याच अधिकारक्षेत्रात पैशांत हस्तांतरण करण्यात आले, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी जून महिन्यात जारी केलेल्या निवेदनात, एफएटीएफने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच असे हल्ले पैसे आणि दहशदवाद्यांच्या समर्थकांकडून निधीची देवाणघेवाण झाल्याशिवाय होणे शक्य नाही असेही म्हटले होते. तेव्हाच त्यांनी त्यांच्या जागतिक नेटवर्कद्वारे अशी प्रकरणे एकत्रित करत दहशतवादाला होणार्‍या वित्त पुरवठ्याचे विश्लेषण करण्याची योजना असल्याचे म्हटले होते.

रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?

दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा गैरवापर याबाबतच्या केस स्टडिज सादर करताना, एफएटीएफने त्यांच्या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, ४० सीपीआरएफ जवानांचा मृत्यू झाला होता, त्या पुलवामा येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्यात वापरले गेलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (IED) मधील एक प्रमुख घटक ‘अ‍ॅल्युमिनियम पावडर (Aluminum powder)’ ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन मार्केटप्लेस (EPOM)) अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करण्यात आली होती.

“भारतीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे की, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदने घडवून आणवा होता. तपासात भारतात मोठ्या संख्यने स्फोटके सीमेपलीकडून आणण्यात आल्याचे समोर आले. विशेष बाब म्हणजे, हल्ल्यात वापरलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइसाठीचा मुख्य घटक- अ‍ॅल्युमिनियम पावडर- हे ईपीओएम अ‍ॅमेझॉनवरून मिळवण्यात आले. हे मटेरियल स्फोटाचा प्रभाव वाढवण्यासाठी वापरण्यात आले होते,” असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एफेटीएपने ऑनलाईन पेमेंट सेवा आणि व्हिपीएनचा वापर एकट्याने केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांना निधी पुरवण्यासाठी कशा प्रकारे करण्यात याला याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जसेच की गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर एप्रिल २०२२ मध्ये झालेला हल्ल्यावेळी अशाच पद्धतीने निधी पुरवला गेला होता. या वेळी ISIL च्या विचारसरणीने प्रभावित एका व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता आणि त्याची आर्थिक तपासणी केला असता असे आढळून आले की, त्या व्यक्तीने पेपाल (PayPal) च्या मदतीने ISIL च्या समर्थनार्थ परदेशात ६,६९,८४१ रुपये (७,६८५ डॉलर्स) हस्तांतरित केले होते. यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय थर्ड-पार्टी व्यवहारांचा वापर केला गेला आणि आयपी एड्रेस दडवण्यासाठी व्हीपीएन सर्व्हिसेसचा वापर केला होता. तसेच त्याला परदेशी स्रोताकडून १०,३२३.३५ रुपये (१८८ डॉलर्स) देखील मिळाले होते, असेही रिपोर्टमद्ये म्हटले आहे.