काश्मीरच्या दक्षिणेला असणाऱ्या पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात गुरूवारी सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येथील एका घरात चार ते पाच दहशतवादी लपून बसले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालत हा संपूर्ण परिसर खाली केला आणि कारवाईला सुरूवात केली. हा परिसर श्रीनगर-जम्मू या राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच्या अंतरावर आहे. काही वेळापूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या कारवाईत सीआरपीएफची १३० बटालियन, ५५ रायफल रेंजर्स आणि विशेष कृती दलाचे जवान सहभागी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.