१ लाख रुपयांवरील आर्थिक घोटाळ्याच्या प्रसंगांना यापूर्वी अनेक सरकारी तसेच खासगी बँकांना सामोरे जावे लागले आहे. अर्थातच हे गैरव्यवहार संबंधित बँकांचे कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या मध्यस्थाद्वारे झाले आहेत. पैकी अनेक प्रकरणात थेट बँकेच्या संचालक पदावरील व्यक्तीलाही कारवाईकरिता सामोरे जावे लागले आहे.

एकटय़ा किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या बुडित कर्जामध्ये देशातील १७ हून अधिक बँकांचे ताळेबंद पोळले गेले. त्यांची एकत्रित ९,५०० कोटी रुपयांची रक्कम अद्यापही बँकेच्या जमा बाजुस आलेली नाही.

सध्याचा बँक घोटाळा केवळ देशातील बँकच नव्हे तर एकूणच आर्थिक घोटाळ्यांवर वरचढ ठरणारा असल्याचे मानले जाते. भांडवली बाजाराशी संबंधित केतन पारेख (सन २००१, १३७ कोटी रुपये), हर्षद मेहता (सन १९९८, ४९९९ कोटी रुपये) तसेच ताळेबंद फुगवल्याची स्वत;हून कबुली देणाऱ्या सत्यम कम्प्युटर्स (सन २००९, ७,१३६ कोटी रुपये) या आर्थिक घोटाळ्यांनाही मागे टाकणारा सध्याचा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा असल्याचे स्पष्ट होते.

(कंसात घोटाळ्याला निमित्त)

’ २०१८ – पंजाब नॅशनल बँक – ११,४०० कोटी रुपये

(नीरव गुप्ता व कुटुंबिय)

’ २०१८ – आंध्र बँक – ५०० कोटी रुपये

(गुजरातस्थित औषधनिर्माण कंपनी)

’ २०१७ – आयडीबीआय – ९,५०० कोटी रुपये

(किंगफिशर एअरलाईन्स व विजय मल्या)

’ २०१६ – सिंडिकेट बँक – १,००० कोटी रुपये

(चार व्यक्तींमार्फत ३८६ बनावट बँक खाती)

’ २०१५ – सेंटल बँक ऑफ इंडिया – २,११२ कोटी रुपये

(जैन इन्फ्राप्रोजेक्टच्या कर्मचाऱ्यांमार्फत)

’ २०१४ – सेंटल बँक ऑफ इंडिया व सिंडिकेट बँक – ८,७०० कोटी रुपये

(गुजरातस्थित औषधनिर्माण कंपनी)