पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे मायस्त्रो डेबिट कार्ड ३१ जुलैनंतर ब्लॉक होणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ग्राहकांना आपले जुने मायस्त्रो डेबिट कार्ड नव्या EMV चिप असलेल्या कार्ड्समध्ये बदलवून घ्यावे लागणार आहे. असं न केल्यास जुने कार्ड ब्लॉक होतील आणि फक्त नवे EMV चिप असलेले कार्डच चालू राहतील. हे कार्ड बदलून घेण्यासाठी बँक कोणतेही शूल्क आकारणार नाही. कार्ड बदलण्याचे काम आरबीआयच्या २०१५ मध्ये जारी करण्यात आलेल्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे. आरबीआयने आपल्या अॅडव्हायजरीमध्ये सर्व बँकांना सुरक्षिततेसाठी EMV चिप असलेले कार्ड जारी करण्यास सांगितले होते. कार्ड बदलण्यासाठी बँक एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याची माहिती देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकेने कार्ड बदलण्याची गरज असलेले सुमारे एक लाख ग्राहक शोधून काढले आहेत. पीएनबीकडे सुमारे ५.६५ कोटी कार्ड धारक आहेत. बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी एका वर्षांत एकदाही आपल्या जुन्या मायस्त्रो डेबिट कार्डचा वापर केलेला नाही. त्यांना या निर्णयापासून दूर ठेवण्यात येणार आहे. आरबीआयच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत जुने मॅग्नेटिक चिप असलेले कार्ड बदलून EMV चिप असलेले कार्ड जारी करणे जरूरीचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab national banks maestro debit card will get blocked 31 july
First published on: 03-07-2017 at 16:42 IST