पंजाब पोलिसांनी दहशतवादी कारवायांशी संबंधित एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.

असे सांगितले जात आहे की, हे आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूल आहे ज्यावर कॅनडास्थित लखबीर लांडा आणि पाकिस्तानस्थित हरविंदर रिंडा यांचे नियंत्रण आहे. या मॉड्यूलच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक एके-56 रायफल, दोन मॅगझिन आणि ९० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानने आपल्या कुरापती बंद केलेल्या नाहीत. दररोज दहशतवादी मॉड्यूल पकडले जात आहेत. पंजाब मधील वातावरण बिघडवण्यासाठी धार्मिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या लोकांवर हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी पंजाबमध्ये पाच दहशतवाद्यांना कारमधून जात असताना पकडले होते आणि त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.