ब्रिटनच्या राजप्रासादाला अधूनमधून भेट देणाऱ्या पाहुण्यांनी चघळून-चावून उरलेला च्युइंगम भिंतींना चिकटवून गेल्याने तो साफ करण्यासाठी इंग्लंडची राणी चक्क सफाई कामगारांच्या शोधात आहे.
 यासाठी वर्षांकाठी राणीने १६ हजार पौंड इतका पगार देण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी एक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ऐतिहासिक राजवाडय़ाच्या भिंतींवर ठिकठिकाणी चिकटवलेला च्युइंगम काढण्यासाठी लागणाऱ्या सफाई कामगारासाठी जागा भरणे आहे, अशा आशयाची ही जाहिरात राजघराण्याच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आल्याचे सूत्रांनी सांगितले.