राफेल डीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.

न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी २२ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. राफेल डीलमध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे न्यायालयाने म्हटले आहे.

राफेल डीलच्या विषयात काही कागदपत्रांचा स्वीकार करण्यासंबंधी निर्णय घ्यायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कुठलीही टिप्पणी करण्याचा प्रश्नच नव्हता असे सर्वोच न्यायालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी
चौकीदार चोर आहे हे आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. सुप्रीम कोर्टानेही हे मान्य केलं आहे की, चौकीदार चोर आहे. राफेल प्रकरणात दोन लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. एक व्यक्ती नरेंद्र मोदी आहे तर दुसरी व्यक्ती अनिल अंबानी असल्याचे राहुल म्हणाले.इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी यावेळी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हानही देऊन टाकले.