पीटीआय, नवी दिल्ली

आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’अर्थात भारतातील हिंदू विकास दराविषयी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. खासगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्याजदर, मंदावलेला आर्थिक विकास दर यामुळे आपला भारत देश हा हिंदू विकास दराच्या जवळ आला आहे असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
bjp leader dinesh sharma marathi news, mahavikas aghadi two three lok sabha marathi news
“महाविकास आघाडीत कुठलाच ताळमेळ नाही”, भाजप प्रभारी दिनेश शर्मा यांची टीका; म्हणाले, “त्यांना केवळ दोन किंवा तीन…”
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
sonam wangchuk china march
सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”

‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ अर्थशास्त्रातील एक थिअरी आहे. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून होते. समाजात तेव्हा गरिबी होती. पायाभूत सुविधा म्हणजे फक्त रेल्वे होत्या. रस्त्यांचा अभाव होता. त्यानंतर स्वातंत्र्याला ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत हा ग्रोथ रेट बराच कमी झाला होता. या मंदगतीने विकास करणाऱ्या विकास दराविषयी बोलताना १९७८ मध्ये हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा उल्लेख झाला होता. हा उल्लेख त्यावेळी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक राज कृष्ण यांनी हे नाव घेतले होते. राज कृष्ण यांनी १९७८ मध्ये हे नाव घेतल्यानंतर अर्थशास्त्रज्ञ हे नाव घेऊ लागले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी आपला देश आर्थिकदृष्टय़ा मागासलेला होता.