इंदूर मतदार संघातील आपचे उमेदवार अनिल त्रिवेदी यांचा प्रचार करताना ‘आप’च्या प्रवक्त्या शाजिया इल्मी यांनी ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या भाजपच्या नाऱयावर टीका करत ‘घर घर शिक्षा और स्वास्थ’ असा ‘आप’चा नारा असल्याचे म्हटले. या नाऱयातून देशातील प्रत्येक नागरिकासाठी शिक्षण, आरोग्य आणि भ्रष्टाचार मुक्त भारत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही त्याम्हणाल्या.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, राहुल यांना अजून प्रगती करण्याची गरज असून अद्याप ते परिपक्व झालेले नाहीत. ते सध्या एखाद्या ‘टेडी बिअर’ सारखे आहेत. त्यांना जर राजकारणामध्ये राहायचे असेल तर स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. अशी टीकाही शाजिया इल्मी यांनी केली. आपचे उमेदवार अनिल त्रिवेदी आणि इल्मी यांनी यावेळी इंदूरमधून तब्बल सातवेळा निवडून आलेल्या स्थानिक खासदार सुमित्रा महाजन यांच्यावरही आरोपांचा हल्लाबोल केला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित
राहुल गांधी हे ‘टेडी बिअर’- ‘आप’च्या शाजिया इल्मींची टीका
इंदूर मतदार संघातील आपचे उमेदवार अनिल त्रिवेदी यांचा प्रचार करताना 'आप'च्या प्रवक्त्या शाजिया इल्मी यांनी 'हर हर मोदी, घर घर मोदी' या भाजपच्या नाऱयावर टीका करत 'घर घर शिक्षा और स्वास्थ' असा 'आप'चा नारा असल्याचे म्हटले.

First published on: 14-04-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi a teddy bear shazia ilmi