मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचंही मुंबईत आगमन झालं आहे.

मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या पैशांवरून राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी काही वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांचा उल्लेख केला.

हेही वाचा- भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवारांचं थेट भाष्य, म्हणाले…

यावेळी राहुल गांधी म्हणाले, जी-२० परिषदेच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील नेते सध्या भारतात येत आहेत. आज सकाळी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. ‘द गार्डीयन’ आणि Financial times सारख्या जगातील प्रसिद्ध वृत्तपत्रांनी मोठं वृत्त दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित एका कुटुंबाने आपल्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये स्वत: पैसे गुंतवले, असं वृत्त संबंधित वृत्तपत्रांनी दिल्याची माहिती राहुल गांधींनी दिली.

हेही वाचा- “पंतप्रधान कार्यालयातून मुंबईचा कारभार चालवणार का?” ‘त्या’ निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या एका कुटुंबाने आपल्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले. म्हणजे अदाणींच्या कंपनीच्या नेटवर्कद्वारे एक बिलीयन डॉलर्स (अंदाजे ८२७० कोटी) भारतातून वेगवेगळ्या देशात गेले आणि पुन्हा भारतात आले. त्या पैशांच्या माध्यमातून अदाणींनी आपल्या कंपनीचे शेअर्स वाढवले. यातून मिळणाऱ्या नफ्यातून अदाणी विमानतळं, बोटी विकत घेत आहेत. आता त्यांना धारावीतील मोठा प्रकल्प मिळाला आहे. सध्या अदाणी देशाची संपत्ती याच पैशातून खरेदी करत आहेत. यावरच या वृत्तपत्रांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.