खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच अदाणी आणि मोदींच्या संबंधांवर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, वारंवार एकच प्रश्न विचारल्याने त्यांनी एका पत्रकारालाही सुनावल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा – “माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

नेमकं काय घडलं?

आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषेदेत राहुल गांधींनी अदाणींच्या मुद्द्यावरून मोदी सरकावर जोरदार टीका केली. दरम्यान, यावेळी तीन पत्रकारांनी त्यांना ओबीसींची माफी मागण्यासंदर्भात आणि भाजपाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. त्यानंतर राहुल गांधी यांनी थेट पत्रकाराचे कान टोचत तुम्ही भाजपासाठी काम करता का? असा प्रतिप्रश्न केला.

ते म्हणाले, तुम्ही तीन वेळा मला एकच प्रश्न विचारला. तुम्ही भाजपासाठी काम करता का? प्रश्नच विचारायचा असेल किमान फिरवून विचारा. जर तुम्हाला भाजपासाठी काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा लोगो लाऊन फिरा. त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुम्ही पत्रकार असल्याचा दिखावा करू नका. तसेच यावेळी शांत झालेल्या पत्रकाराला ‘क्यू हवा निकल गई क्या?’ असं म्हणत टोलाही लगावला.

हेही वाचा – Video: अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींचा परखड सवाल, नेमका रोख कुणाकडे?

दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी भाजपाच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले, मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही.