लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची मध्य प्रदेशातील शहडोल येथे सोमवारी (८ एप्रिल) जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर राहुल गांधी पुढच्या नियोजित दौऱ्यावर जाण्यासाठी निघणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करु शकणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी सभेनंतर तिथेच अडकले.

इंधनाअभावी हेलिकॉप्टर उड्डाण करु न शकल्यामुळे सोमवारी रात्री राहुल गांधी यांच्यावर शहडोलमध्ये मुक्काम करण्याची वेळ आली. यानंतर ते मंगळवारी सकाळी पुढील नियोजित दौऱ्यावर निघतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, इंधन टंचाई जाणवल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर हेलिकॉप्टरसाठी इंधन भोपाळहून मागविण्यात येणार होते. पण त्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे राहुल गांधी हे सभा संपल्यानंतर शहडोलमध्येच एका खासगी हॉटेलमध्ये थांबले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…

हेही वाचा : मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; ‘मुस्लिम लीग’ टिप्पणीवरून काँग्रेस-भाजपमध्ये वादंग

यावेळी या सभेत बोलताना राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील महत्वाचे आश्वासन पुन्हा एकदा जनतेला सांगत काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु, अशी मोठी घोषणाही त्यांनी केली. तसेच प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपये देऊ, असे आश्वासनही राहुल गांधींनी यावेळी दिले.

काँग्रेसचे इंधन संपले…

भाजपा नेते शिवराज सिंह चौहान म्हणाले, “आज विविध ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होत या ठिकाणी पोहोचलो. मला सांगण्यात आले की, वादळ आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ नका. पण मी त्यांना सांगितले कितीही वादळ आले तरी मी माझ्या लोकांना मी नक्की भेटणार. आम्ही लोकांवर प्रेम करतो म्हणूनच आम्ही वादळातही येतो. राहुल गांधी शहडोलमध्ये प्रचार करण्यासाठी आले होते. पण इंधनाअभावी त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करु शकले नसल्याची माहिती सांगण्यात आली. आता खरे तर हेलिकॉप्टरचे नाही काँग्रेसचेच इंधन संपले आहे”, असा टोला भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी एका प्रचारसभेत बोलताना लगावला.