पीटीआय, स्टॅनफर्ड (कॅलिफोर्निया)
खासदारकी रद्द झाल्यामुळे लोकांची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. राहुल सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कॅलिफोर्नियामधील प्रतिष्ठित स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या आवारात भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आपण राजकारणात प्रवेश केला तेव्हा आपण लोकसभेचे सदस्य राहण्यास अपात्र होऊ असे कधीही वाटले नव्हते.




भारत जोडो यात्रेबद्दल माहिती देताना राहुल म्हणाले की, ‘हे सर्व नाटय़ साधारण सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले. त्यावेळी आम्ही, भारतातील सर्व विरोधी पक्ष धडपडत होतो. (त्यांच्याकडे) प्रचंड आर्थिक वर्चस्व होते, त्यांनी सर्व संस्था ताब्यात घेतल्या होत्या. आम्ही लोकशाही पद्धतीने लढण्यासाठी धडपडत होतो. त्यावेळी आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.’