घोटाळेबाज लोकप्रतिनिधींची पाठराखण करणाऱया अद्यादेशासंदर्भात पंतप्रधानांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.
“राहुल गांधींनी केलेले वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. तसेच राष्ट्राच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागावी” असे म्हणत चौहान यांनी राहुल गांधींवर टीकेचा सुर उमटविला. ते जनाशिर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी नरसिंगपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विरुद्ध पक्षाच्याच नेत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे त्यांनी पायउतार व्हावे असेही चौहान म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘राहुल गांधींनी देशाची माफी मागावी’- शिवराजसिंह चौहान
घोटाळेबाज लोकप्रतिनिधींची पाठराखण करणाऱया अद्यादेशासंदर्भात पंतप्रधानांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी

First published on: 29-09-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul should apologize for his remarks on ordinance shivraj singh chouhan