RRB-NTPC Exam Violence In Bihar: बिहारमध्ये रेल्वेच्या परीक्षांवरुन सुरु झालेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण मिळालं आहे. २६ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या या परीक्षेवरुन राज्यामध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्जचाही आरोप केलाय. गयामध्ये या आंदोलनातील तरूणांनी एका ट्रेनवर दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली. याच प्रकरणी आता सोशल नेटवर्किंगवरुन प्रसिद्ध झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण ४०० जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केलीय.

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे.

vasai gold chain theft marathi news
वसईत ‘बंटी बबलीची’ अनोखी चोरी, प्रख्यात ज्वेलर्स दुकानाला हातोहात गंडवले
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाबद्दल खान सर यांनी बुधवारी एक पत्रक जारी करुन आपलं म्हणणं मांडलं आहे. आरआरबीने जो काही निर्णय घेतलाय तो १८ तारखेलाच घेण्यात आला असता तर सध्या जी परिस्थिती निर्माण झाली ती झाली नसती. आज आरआरबीने योग्य निर्णय घेत १६ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे सल्ले त्यांनी मागवल्याचं खान सर म्हणालेत.

खान सर हे एक लोकप्रिय शिक्षक आहेत. सोशल मीडिया आणि युट्यूबवर त्यांचं खान जीएस रिसर्च सेंटर नावाचं प्रसिद्ध चॅनेल आहे. कठीण गोष्टी सोप्या शब्दात समजून सांगण्याच्या शैलीसाठी खान सर यांना ओळखलं जातं.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (एनटीपीसी) नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षाचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.

याच मुद्द्यावरुन बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि रेल्वे भरती बोर्डाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरले आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यात बुधवारी याच आंदोलनादरम्यान एका ट्रेनला आंदोलक विद्यार्थ्यांनी आग लावली.

परीक्षा स्थगित
रेल्वे परीक्षेच्या निकालात घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने बुधवारी (२६ जानेवारी) एनटीपीसी आणि पहिल्या टप्प्यातील परीक्षा स्थगित केलीय. तसेच एका समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांशी चर्चा करुन एक अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिलीय.