RRB-NTPC Exam Violence In Bihar: बिहारमध्ये रेल्वेच्या परीक्षांवरुन सुरु झालेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण मिळालं आहे. २६ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या या परीक्षेवरुन राज्यामध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली. भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्जचाही आरोप केलाय. गयामध्ये या आंदोलनातील तरूणांनी एका ट्रेनवर दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली. याच प्रकरणी आता सोशल नेटवर्किंगवरुन प्रसिद्ध झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण ४०० जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways exam protest patnas khan sir others booked for inciting violence scsg
First published on: 27-01-2022 at 08:18 IST