ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीशी सामना करावा लागणार आहे. रेल्वेच्या प्रथम श्रेणी प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार असून, ती २ टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांनी यापूर्वीच भाडेवाढीचे संकेत दिले होते. इंधन आणि अन्य खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. या भाडेवाढीतून या वर्षाच्या राहिलेल्या सहा महिन्यांत रेल्वे १२५० कोटी रूपये जमा करणार आहे; पण उपनगरीय आणि बिगर उपनगरीय भाडे मात्र वाढविले जाणार नाही. एसी आणि स्लीपर श्रेणीचे भाडे २ टक्क्यांनी वाढणार आहे.
सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन १ ऑक्टोबरपासून सर्व प्रकारच्या मालवाहतुकीवर १५ टक्के लेव्ही लावण्यात आली आहे; तर एफएसी अंतर्गत भाडे व दरवाढ १० ऑक्टोबरपासून लागू होईल. बाजारातील स्थितीनुसार दर ६ महिन्यांनी प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीचा दर वाढविण्यात येणार आहे
* प्रथम श्रेणी प्रवासाचे महागलेले नवे दरपत्रक..प्रवास- चर्चगेट-दादर, सीएसटी-दादर, सीएसटी-वडाळा रोड
पूर्वीचे भाडे– ६० रू.
नवे भाडे– ६५ रु.
मासिक पास (जूना दर)– ४२५ रू.
मासिक पास (नवा दर)– ४३०रु.
प्रवास- सीएसटी-विक्रोळी, चर्चगेट-अंधेरी, सीएसटी – मानखूर्द
पूर्वीचे भाडे– ९० रू.
नवे भाडे– ९५ रू.
मासिक पास (जूना दर)– ५६५ रू.
मासिक पास (नवा दर)– ५७० रू.
प्रवास- चर्चगेट-बोरीवली, सीएसटी-ठाणे, सीएसटी वाशी
पूर्वीचे भाडे– १२० रु
नवे भाडे– १२५ रु
मासिक पास (जूना दर)– ६४५ रु.
मासिक पास (नवा दर)– ६५५ रू.
प्रवास- चर्चगेट-विरार,सीएसटी- अंबरनाथ
पूर्वीचे भाडे- १४५ रु.
नवे भाडे– १५० रु.
मासिक पास (जूना दर)– १०२५ रु.
मासिक पास (नवा दर)– १०३५ रु.
प्रवास- सीएसटी-कल्याण, चर्चगेट-वसईरोड, सीएसटी-पनवेल
पूर्वीचे भाडे- १४० रु.
नवे भाडे– १४५ रु.
मासिक पास (जूना दर)– ९९५ रु.
मासिक पास (नवा दर)– ९६५ रु.