scorecardresearch

‘मला या अपनास्पद पदातून मुक्त करा’..आणखी एका काँग्रेस आमदाराने पक्षाला ठोकला रामराम?

अशोक चंदना यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे आपला रोष व्यक्त केला आहे.

राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारमध्ये सर्व काही सुरळीत होत नसल्याचे दिसत आहे. राजस्थानचे मंत्री अशोक चंदना यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘मला या अपनास्पद पदातून मुक्त करा’ अशी विनंती चंदना यांनी गहलोत यांच्याकडे केली आहे.

ट्विट करत व्यक्त केली नाराजी

चंदना यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना उद्देशून ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘माननीय मुख्यमंत्री महोदय, माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे, की मला या अपमानास्पद मंत्रिपदावरून मुक्त करा आणि माझ्या सर्व खात्यांचा कार्यभार कुलदीप रांका यांच्याकडे द्या, कारण ते सर्व विभागाचे मंत्री आहेत’.

गेल्या आठवड्यात एका आमदाराने दिला होता राजीनामा
रांका हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश घोघरा यांनी गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे राजीनामा दिला होता. डुंगरपूर जिल्ह्यात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर घोघरा यांनी हे पाऊल उचलले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan sports minister ashok chandna offered to resign to cm ashok gehlot dpj

ताज्या बातम्या