संयुक्त जनता दल आणि शिवसेना या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दोन प्रमुख पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी भाजपचा उमेदवार जाहीर करण्यासाठी सातत्याने दबाब येत आह़े,  परंतु गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य उमेदवारीला शह देण्यासाठी चाललेल्या या दबावतंत्राला बळी न पडता भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मात्र सबुरीचे धोरण स्वीकारले आह़े
तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘जदयु’शी फारकत घेऊन पक्षाच्या अडचणी वाढविण्यापेक्षा हा वाद सामंजस्याने सोडविण्याचा राजनाथ यांचा प्रयत्न आह़े  ‘रालोआ’चे सदस्य योग्य वेळी बैठक घेऊन पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतील, असे राजनाथ यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आह़े