गुजरात राज्यात सलग तिस-यांदा भाजपची सत्ता आणणारे नरेंद्र मोदी हे ‘यशस्वी मुख्यमंत्री’ असल्याची स्तुतिसुमने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आपल्या भाषणात उधळली. याआधी अशी प्रसिद्धी कोणत्याही मुख्यमंत्र्याला मिळाली नव्हती असंते म्हणाले. नवी दिल्ली भाजपची राष्ट्रीय परिषद सभा सुरू आहे. या सभेत सर्वत्र नरेंद्र मोदींचाच बोलबाला दिसून येत आहे. सभेची सुरूवात राजनाथ सिंग यांच्या भाषणाने झाली आणि यात नरेंद्र मोदींचे अभिनंदन राजनाथ सिंग यांनी केले. ते म्हणाले की, “आम्ही भाजपला सलग तीनवेळा एका नेतृत्वाखाली निवडूनयेताना कधी पाहीले नव्हते ते नरेंद्र मोदींनी करून दाखविले.” तसेच राजनाथ सिंग यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रामन सिंग यांचेही पक्षाच्यावतीने सदर राज्यांमधील भाजप सरकार यशस्वीरीत्या सांभाळण्याबद्दल अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी सर्वात ‘यशस्वी मुख्यमंत्री’, राजनाथ सिंग यांची स्तुतिसुमने
गुजरात राज्यात सलग तिस-यांदा भाजपची सत्ता आणणारे नरेंद्र मोदी हे 'यशस्वी मुख्यमंत्री' असल्याची स्तुतिसुमने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आपल्या भाषणात उधळली. याआधी अशी प्रसिद्धी कोणत्याही मुख्यमंत्र्याला मिळाली नव्हती असंते म्हणाले. नवी दिल्ली भाजपची राष्ट्रीय परिषद सभा सुरू आहे.

First published on: 02-03-2013 at 06:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh lauds narendra modi as most popular cm