पीटीआय, नवी दिल्ली

दहशतवादाचा सामूहिकपणे निपटारा करणे आणि दहशतवादाच्या समर्थकांवर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक आहे असे परखड मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर टीका केली.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

‘एससीओ’च्या सदस्य देशांनी एकमेकांचे वैध हितसंबंध लक्षात घेऊन त्यांच्या स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, असा भारताचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याच्या तरतुदीवर आधारित शांतता आणि सुरक्षा राखण्यावर भारताचा विश्वास असून ‘एससीओ’च्या सदस्य देशांमध्ये विश्वास आणि सहकार्याची भावना वाढीस लागण्यासाठी भारत प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले.