ओठात सिगरेट शिलगावलेल्या आपल्या छबीची मोहिनी सदैव तरुणांवर घालणारे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी तरुणांनी धूम्रपान करू नये, असे आवाहन केले आहे, तसेच आपली कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे स्पष्ट केले. आपल्या वाढदिवसाप्रीत्यर्थ शुभेच्छा देण्यासाठी गोळा झालेल्या चाहत्यांशी रजनीकांत यांनी संवाद साधला. आपली तब्येत ढासळण्यास प्रामुख्याने धूम्रपानच कारणीभूत आहे. मात्र प्रयत्न करूनही ही सवय सोडणे आपल्याला शक्य झालेले नाही, अशी प्रांजळ कबुली रजनीकांत यांनी या वेळी दिली.राजकारणात येण्याविषयीच्या सर्व शक्यता फेटाळून लावत तो आपला प्रांत नसल्याचे त्यांनी सांगितले. तामिळी लोकांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल रजनीकांत यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
धूम्रपान सोडण्याचे रजनीकांत याने केले चाहत्यांना आवाहन
ओठात सिगरेट शिलगावलेल्या आपल्या छबीची मोहिनी सदैव तरुणांवर घालणारे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी तरुणांनी धूम्रपान करू नये, असे आवाहन केले आहे, तसेच आपली कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे स्पष्ट केले.

First published on: 15-12-2012 at 12:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnikanth asks fans to kick smoking habit