काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसबोत एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा चुरगळलेला शर्ट घातला होता. त्या फोटोत दिसणारी व्यक्ती कोणी सामान्य माणूस नसून व्यावसायिक राकेश झुनझुनवाला होते. त्यांच्या अकासा एअर या कंपनीने बोईंग या विमान उत्पादक कंपनीशी मोठा करार केला आहे. इंधन बचत करणाऱ्या ७२ विमानांच्या या व्यवहाराची किंमत साधारणपणे ९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास साधारण ९०० कोटींच्या आसपास हा व्यवहार होत आहे.

दुबईमधल्या एका कार्यक्रमात बोलताना या अकासा एअर कंपनीचे कार्यकारी संचालक विनय दुबे यांनी सांगितलं, आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आमचा विमानाचा पहिला व्यवहार बोईंग या कंपनीसोबत करत आहोत. आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. किफायतशीर, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक विमानसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ही नवी ७३७ मॅक्स विमानं फायदेशीर ठरतील.

दुबे पुढे म्हणाले, विमानउद्योगात भारत आता जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. अकासा एअर या कंपनीला भारताच्या विकासाला हातभार लावायचा आहे, तसंच समाजातल्या सर्व गटातल्या लोकांसाठी विमानप्रवास सुखकर आणि सोयीस्कर बनवायचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोईंगसोबत झालेल्या या करारानुसार अकासा एअर या कंपनीकडे ७२ विमानं येणार आहेत. ही विमानं ७३७ मॅक्स या प्रकारातली असून त्यांची किंमत साधारणपणे ९०० कोटी इतकी आहे. ही विमानं इंधनबचत करणारी आहेत