शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती गेल्या काही काळात चांगलीच वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे नाझारा टेक, टायटन कंपनी, टाटा मोटर्स सारख्या शेअरमध्ये झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे आहे. टाटा मोटर्सच्या शेअर किमतीचा इतिहास पाहता, राकेश झुनझुनवाला यांनी या शेअरमधून फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ३१० कोटी रुपये कमावले आहेत. 

६ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३३५.६० रुपये होती, जी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढून ४१७.८० रुपये झाली. म्हणजेच, टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या तीन दिवसात २५% पर्यंत चढले. राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये १.१४% हिस्सा आहे. त्यानुसार, त्यांनी फक्त तीन  ट्रेडिंग सत्रांमध्ये ३१० कोटी रुपयांचा नफा कमावला.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

सोमवारी, BSE वर ७.३९ टक्क्यांच्या वाढीसह तो ४११.२५ रुपयांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, टाटा मोटर्स DVR चे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह २०१.१० रुपयांवर बंद झाले.

जून २०२१ च्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे एकूण ३,७७,५०,००० शेअर्स होते. हे कंपनीच्या एकूण १.१४% हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहे. यापूर्वी मार्च २०२१ च्या तिमाहीत, झुनझुनवालाकडे टाटा मोटर्सचे ४,२७,५०,००० शेअर्स होते. जून तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील हिस्सा कमी केला होता. 

भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC

राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

झुनझुनवालांकडे ४० टक्के भागीदारी

राकेश झुनझुनवाला हे ज्यावेळी बहुतांश विमान कंपन्या तोट्यात आहेत त्या वेळी तो नवीन विमानसेवा सुरू करत आहे. त्यांनी अनेक खासगी विमान कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. याशिवाय ते अनेक मोठ्या तज्ज्ञांचे मतही घेत आहे. आकासा विमान कंपनीने प्रवाशांना नवीन मार्गाने प्रवास करण्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांची विमाने अगदी लहान विमानतळांवरही सहज उतरू शकतील. अलीकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला यांनी आकासामध्ये ४० टक्के भागभांडवल असल्याचे सांगितले होते. या कंपनीकडे पुढील चार वर्षात १८० आसन क्षमतेची ७० विमाने असतील.