Ayodhya Ram Mandir Inauguration : “राम आग नाही ऊर्जा आहे. राम विवाद नाही समाधान आहे. राम वर्तमान नाही अनंतकाल आहे. राम भारताचा आधारही आहे आणि विचारही आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना म्हणाले. आज (२२ जानेवारी) अभिजीत मुहूर्तावर भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘एक काळ असा होता की लोक म्हणायचे की राम मंदिर तयार झालं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला ओळखत नाहीत. श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. या बांधकामामुळे आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. आजपासून आपल्याला पुढील १००० वर्षांपर्यंत पाया रचायचा आहे. मंदिर निर्माणापासून पुढे होत देशवासियांनी भव्य आणि दिव्य भारत निर्माणाची शपथ घेत आहेत. रामाचे विचार मनासह जनमनातही असे पाहिजेत. हीच राष्ट्र निर्माणाची पायरी आहे. आजच्या युगाची मागणी आहे की आपल्याला आपलं अंतःकरण विस्तारायचं आहे. हनुमानाची भक्ती, सेवा आणि समर्पणाला आपल्याला बाहेर शोधायचं नाही. आपल्या भारतीयांमध्ये हे गुण असतातच. हेच विचार देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र घडवण्यासाठी आधार देतील.

हेही वाचा >> “मी आज प्रभू रामाची माफी मागतो, मला खात्री आहे की..”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चर्चेत

आता नवराष्ट्र निर्मिती होणार

आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवलं त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करतो आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. आज आपण सगळे हा क्षण आपण जगतो आहोत, आपण पाहतो आहोत. आजचा दिवस, दिशा सगळं काही दिव्य झालं आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. आपल्याला सगळ्यांन ठाऊक आहे की रामाचं काम जिथे असतं तिथे पवनपुत्र हनुमानही विराजमान असतात. मी आज रामभक्त आणि हनुमानगढीलाही प्रणाम करतो.

हेही वाचा >> “देशातील बहुसंख्यांक समाजाने…”, प्राणप्रतिष्ठा होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितली खंत

प्रभू रामाची मी आज माफी मागतो

माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. मी दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत असं वाटतं आहे मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू रामाची माफीही मागतो आहे. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगं हे करु शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरुन काढली आहे. मला विश्वास आहे की प्रभू राम आज आपल्याला माफ करतील.