श्रीलंकेतील संसदीय निवडणुकीत अंतिम निकाल जाहीर होण्याच्या आधीच माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी पराभव मान्य केला आहे. युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्स (यूपीएफए) या आघाडीने युनायटेड नॅशनल पार्टी या पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाविरोधातील निवडणूक लढतीत पराभव पत्करला आहे.
सध्याचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे हे आघाडी सरकारचे पंतप्रधान होत असून त्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. मंत्र्यांची नेमणूक त्यानंतर करण्यात येणार आहे, युनायटेड नॅशनल पार्टी या पक्षाला बहुमत मिळाले आहे. यूएनपीला १०६ तर यूपीएफएला ९५ जागा मिळाल्या आहेत.
चांगल्या लढतीनंतरही आपण पराभव पत्करत आहोत. यूपीएफएने आठ जिल्ह्य़ांत आघाडी घेतली तर यूएनपीने बावीसपैकी अकरा जिल्ह्य़ांत आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार यूएनपी किंवा यूपीएफए यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळणार नाही.   यूपीएफए पक्षाचा मोठा विजय जानेवारीतील अध्यक्षीय निवडणुकीत झाला होता. असे असले तरी यूएनपीच्या मतांवर त्याचा परिणाम झाला नाही. मार्क्‍सवादी जेव्हीपी किंवा पीपल्स लिबरेशन फ्रंट या संघटनांना या वेळी काही मतांचा फायदा झाला आहे.
उत्तरेकडील तामीळ जिल्ह्य़ांमध्ये तामीळ नॅशनल अलायन्सने स्पष्ट आघाडी घेतली आहे.  निकालावरून तामीळ नॅशनल अलायन्सला १६ जागा मिळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranil wickremesinghe to return as prime minister of sri lanka
First published on: 19-08-2015 at 02:40 IST