जन्मदात्या वडिलांनी आणि भावानेच तब्बल नऊ वर्षे लैंगिक शोषण केल्याची कैफियत उत्तर प्रदेशमधील एका २५ वर्षीय तरुणीने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापुढे बुधवारी मांडली. अंगावर शहारा आणणाऱया या घटनेमुळे महिलांवरील अत्याचाराचे रौद्र रुप पुढे आले आहे. 
अखिलेश यादव यांच्या जनता दर्शन कार्यक्रमात पीडित तरुणीने तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. जन्मदाते वडील आणि लहान भाऊ गेली नऊ वर्षे आपल्यावर लैंगिक अत्याचार करीत आहेत. आतापर्यंत अनेकवेळा माझा गर्भपात करण्यात आला आहे, असे पीडित तरुणीने मुख्यमंत्र्यांना सांगितले. आपल्या आईला हे सर्व माहिती होते. मात्र, घराची बदनामी होईल, म्हणून तिने कोणाला सांगू नकोस, असे तिने आपल्याला बजावल्याचे पीडितेने सांगितले.
यादव यांना ही माहिती कळाल्यावर त्यांनी या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी महिला पोलिसांकडे दिली. त्यानंतर त्यांनी पीडित तरुणीचे वडील आणि भावाला अटक केली. वडील हे रेल्वेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी असून, भाऊ लखनौमधील एका दुकानात काम करतो. पोलिसांनी तिच्या आईलाही अटक केली आहे, असे महिला पोलिस ठाण्याच्या अधिकारी शिवा शुक्ला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raped by father and brother for 9 years lucknow woman tells akhilesh yadav
First published on: 05-09-2013 at 12:48 IST