doctor shaheen ex-husband say she was liberal never religious red fort delhi blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी लखनऊ एका महिला डॉक्टर शाहीन सईद हिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या महिला डॉक्टरबद्दल माजी पती डॉ. हयात जफर यांनी माहिती दिली आहे. शाहीन ही उदारमतवादी आणि धार्मिक नसल्याचे जाफर यांनी यावेळी सांगितले आहे.
दोन मुले असलेल्या या जोडप्याचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला आहेत. तसेच शाहीनची इच्छा होती की त्यांनी ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक व्हावे असेही त्यांनी डॉ. हयात जफर यांनी सांगितले.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील डालिगंज येथील रहिवासी असलेल्या शाहीनला सोमवारी अटक करण्यात आली. ती भारतात जैश-ए-मोहम्मदच्या महिला भरती शाखेचे नेतृत्व करत होती. या संघटनेची महिला शाखा असलेल्या जमात-उल-मोमिनातचे देखील तिने नेतृत्व केले आहे.
माजी पतीने नेमकं काय सांगितलं?
“माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही. माझे तिच्याशी कसलेली जवळचे नाते नाही. आम्ही २०१२ मध्ये विभक्त झालो. आम्हाला दोन मुले आहेत आणि ते माझ्याबरोबर राहतात. आमचे अरेंज मॅरेज झाले होते. आम्ही विभक्त झाल्यापासून माझा तिच्याशी कसलाही संपर्क नाही,” असे डॉ. हयात म्हणाले.
“ती कधीही फार धार्मिक नव्हती, आणि ती उदारमतवादी विचारांची होती. तिची इच्छा होती की आम्ही ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक व्हावे. त्यानंतर आम्ही विभक्त झालो,” असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
डॉ. हयात म्हणाले की ते आणि शाहीन यांच्यात ऑस्ट्रेलियाला जाण्यावरून वाद होता. “आमच्यात ऑस्ट्रेलियाला जाण्यावरून वाद होता. माझी मुले तिच्याशी बोलत नाहीत. ती पल्मोनोलॉजीची प्रोफेसर आहे. २००६ मध्ये तिने तिची पदवी पूर्ण केली,” असेही त्यांनी सांगितले.
शाहीन ही फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशीही जोडलेली होती आणि तीचे डॉ. मुझाम्मिल या एका काश्मीरी डॉक्टरशी जवळचे संबंध होते. या डॉक्टरला देखील त्याच्या फरीदाबाद येथील दोन भाड्याच्या खोल्यांमध्ये २९०० किलो स्फोटके आणि इतर रसायने आढळून आल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी ही अटक करण्यात आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य , प्राध्यापक आणि विद्यार्थी यासह ५२ हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
