74th Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत NCC-NSS कॅडेट्स यांच्यासह प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या देशभरातील तरूण कलावंताना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी मोदी म्हणाले, “मित्रांनो भविष्यासाठी मोठी ध्येय आणि संकल्प हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. मात्र याचबरोबर आपल्याला वर्तमानातील छोट्या-मोठ्या प्राथमिकतानांही तेवढच महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे माझा तुम्हा सर्वांना आग्रह असेल, की देशात होणाऱ्या बदलांची तुम्हाला माहिती असू द्या.”

नक्की पाहा – PHOTOS : प्रजासत्ताकदिनी ‘कर्तव्य’पथावरील आकर्षक चित्ररथांद्वारे घडलं देशातील नारीशक्ती, पर्यटन आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन!

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..
The Supreme Court ruled that the election retention scheme was unconstitutional and therefore illegal
लेख: रोखे रोखले, आता नवे मार्ग शोधूया!

याचबरोबर, “देशात जे नवनवीन अभियान राबवले जात आहेत, त्यात तुम्ही सहभाग घ्या. स्वच्छ भारत अभियानाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. तुम्ही तरुणांनी याला आपल्या आयुष्याचं मिशन बनवलं पाहिजे. तुमच्याकडे कौशल्यही आहे आणि उत्साहही आहे. तुम्ही संकल्प करू शकतात की आम्ही आमच्या मित्रांना सोबत घेऊन आमचं गाव, शहरास स्वच्छ बनवण्यासा कायम कार्यरत राहू. जेव्हा तुम्ही स्वच्छतेसाठी बाहेर पडाल, तेव्हा मोठ्या लोकांवर त्याचा जास्त परिणाम होईल.” असंही मोदी म्हणाले.

Republic Day 2023 Live: दिल्लीतील ‘कर्तव्य पथा’वर पथसंचलनाला सुरुवात; मान्यवरांसह सामान्य नागरिकांचीही मोठी गर्दी!

कमीत कमी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प नक्कीच करा –

याशिवाय, “याचप्रकारे या अमृत मोहत्सवात तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित कमीत कमी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प नक्कीच करा. तुमच्यातील अनेकजण कविता आणि गोष्ट लिहितील. ब्लॉगिंग करण्यातही रस असेल. स्वातंत्र्य लढा आणि एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्यावर असं काही कौशल्यपूर्ण काम करा. तुम्ही तुमच्या शाळेसही या विषयावर कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यास सांगू शकता. तसेच, तुम्हा सर्वांच्या जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरही बनवले जात आहेत. तुम्ही मित्रांसोबत मिळून तुमच्या शेजारील अमृत सरोवरासाठी मोठं योगदान देऊ शकता. जसं की अमृत सरोवराच्या सभोवताली वृक्षारोपण करू शकता. लोकांना जागृत करण्यासाठी फेरी काढू शकता.”असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं.

Republic Day Police Medals : महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांचा शौर्यपदकाने सन्मान!

…ही भारतासाठी एक मोठी संधी आहे –

“देशात सुरू असलेल्या फीट इंडिया मूव्हमेंटबद्दलही तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. तरुणांसाठी तर खूप आकर्षित करणारे हे अभियान आहे. तुम्ही तर याच्याशी जुडाच परंतु सोबत आपल्या कुटुंबीयांनाही याच्याशी जोडा. तुम्ही रोज सकाळी घरी थोडावेळ सर्वजण मिळून योग करा. तुम्ही ही संस्कृती घरी सुरू शकता. तुम्ही ऐकलं असेल की यावर्षी आपला भारत G20 चं अध्यक्षपदही भूषवत आहे. ही भारतासाठी एक मोठी संधी आहे. तुम्ही याबद्दलही नक्कीच वाचा शाळा, महाविद्यालयांमध्येही यावर चर्चा करा.” असंही मोदींनी आवाहन केलं.