पीटीआय, उत्तरकाशी

४१ मजूर गेल्या १५ दिवसांपासून अडकून पडलेल्या सिलक्यारा बोगद्याच्या वरील भागातून सुरू झालेले खोदकाम सोमवारी ३१ मीटपर्यंत पूर्ण झाले. याचवेळी, ढिगाऱ्यातून प्रत्यक्ष (मॅन्युअल) आडवे खोदकाम करण्यासाठी अरुंद खोदकाम करणारे एक पथक सोमवारी घटनास्थळी येऊन पोहचले.सध्या उभ्या दिशेने आणि मजुरांद्वारे आडवे खोदकाम या दोन पद्धतींद्वारे बचावाच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. बोगद्याच्या बारकोट दिशेने आडवे खोदकाम करण्यासारख्या इतर पर्यायांवरही काम सुरू आहे.

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
Nagpur, Gold Prices Drop, Continuous Increase, gold price drop in nagpur, nagpur gold price, today gold price, gold price decrease, gold in nagpur, nagpur news, gold news, marathi news,
खूशखबर…. सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीचे दरही ३ हजारांनी घसरले
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!

 सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी बोगद्याच्या वरील भागातून एकूण ८६ मीटपर्यंत खणावे लागणार आहे. बोगद्याच्या वरील भागातून १.२ मीटर व्यासाचे पाइप टाकावे लागणार असून, अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहचण्याचा दुसरा पर्याय म्हणून याबाबतचे काम रविवारी सुरू झाले.वरील बाजूने ३१ मीटपर्यंत खोदकाम करण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे निवृत्त माजी प्रमुख अभियंते ले.ज. हरपाल सिंग  यांनी सिलक्यारा येथे वार्ताहरांना दिली. सीमा रस्ते संघटनेचे प्रमुख राहिलेले सिंग हे बचाव मोहिमेत सहभागी झाले आहेत.

 मातीच्या थराबाबत जाणून घेण्यासाठी आणि मार्गात काही अडथळे आहेत का हे पाहण्यासाठी वरील दिशेने घालण्यात आलेले २०० मिमी व्यासाचे पाइप ७० मीटपर्यंत पोहचले आहेत. आता मुख्य बोगद्याच्या आत आडव्या दिशेने यंत्रांचा वापर न करता खोदकाम करण्याची तयारी सुरू आहे, असे सिंग यांनी सांगितले. ही धिम्या गतीने चालणारी आणि कठीण प्रक्रिया असून, तीत हे लोक ढिगाऱ्यातून टाकलेल्या ८०० मिलीमीटर व्यासाच्या पाइपमधून एकामागे एक आत शिरतील व आणखी पाइप टाकण्यासाठी फावडय़ांच्या सहायाने ढिगारे हटवतील.

मजुरांचे मनोबल राखण्याचे प्रयत्न

 मानसोपचारतज्ज्ञांद्वारे समुपदेशन, दररोज नातेवाईकांशी बोलणे इ. मार्गानी उत्तराखंडमधील कोसळलेल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांचे मनोबल कायम राखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

 कोसळलेल्या भागात साठलेल्या ढिगाऱ्यापलीकडे दोन किलोमीटरच्या निर्मित क्षेत्रात अडकलेल्या मजुरांपर्यंत एका पाइपमधून एक माईक पाठवण्यात आला असून, त्याच्या सहायाने त्यांना बाहेरच्या लोकांशी बोलता येते.

 ‘घाबरू नकोस. आम्ही प्रयत्न करत आहोत’, असे आत अडकलेल्या सबा अहमद या मजुराचे नातेवाईक ज्यावेळी त्याच्याशी संपर्क साधतात, त्यावेळी सांगत असतात. खोदकामातील अडथळय़ांमुळे बचाव मोहीम लाबणीवर पडली, त्यावेळी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञांनी त्याचे समुपदेशन केले, असे त्याचा भाऊ नैयर अहमद याने सांगितले.