नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारावरील निर्बंध निवडणूक आयोगाने सोमवारी अंशत: शिथिल केल़े  घरोघरी प्रचारासाठीची प्रचारकांची मर्यादा दहावरून २०, तर प्रचारसभेतील उपस्थितांची मर्यादा ५०० वरून एक हजार इतकी करण्यास आयोगाने परवानगी दिली़  मात्र, मोठय़ा जाहीर सभांसह ‘रोडे शो’ आणि पदयात्रांवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्र, आयुक्त राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील करोनास्थितीचा सोमवारी आढावा घेतला़ त्यानंतर प्रचारावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला़  राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आतापर्यंत खुल्या जागेत ५०० जणांचा सहभाग असलेल्या प्रचारसभा घेण्याची परवानगी होती़  ही मर्यादा एक हजार इतकी वाढविण्यात आली आह़े  शिवाय घरोघरी प्रचारासाठी १० प्रचारकांना परवानगी देण्यात आली होती़  ही मर्यादा आता २० इतकी करण्यात आली आह़े ‘रोड शो’, पदयात्रा, वाहनांद्वारे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर ११ फेब्रुवारीपर्यंत बंदी कायम राहील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल़े   पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आह़े  यामुळे किमान पहिल्या टप्प्यात तरी राजकीय पक्षांना मोठय़ा प्रचारसभा आणि ‘रोड शो’ आयोजित करता येणार नाहीत़

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on election rally partially relaxed in uttar pradesh zws
First published on: 01-02-2022 at 04:00 IST