कोलकाता : आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना सीबीआयने सोमवारी आर्थिक अनियमिततांच्या आरोपाखाली अटक केली. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आर जी कर रुग्णालयात निवासी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआय गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील कथित आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास करत आहे.

घोष यांची सोमवारी १५व्या दिवशी सीबीआयच्या सॉल्ट कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या निझाम पॅलेस कार्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी सीबीआयची भ्रष्टाचारविरोधी शाखा आहे, तिथेच त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा >>>“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदारांचे अमित शाह यांना पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोष यांची कारकीर्द

डॉ. घोष फेब्रुवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आर जी कर वैद्याकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांची ऑक्टोबर २०२३मध्ये दुसरीकडे बदली करण्यात आली होती. त्यानंतर एका महिन्याच्या आतच ते पुन्हा कर महाविद्यालयाचे प्राचार्य झाले होते.