अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज सेवनासह इतर आरोपाखाली आज (मंगळवारी) अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. तिच्या अटकेनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून यात सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंह किर्तीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

श्वेता सिंह किर्तीने ट्विट करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. देव आमच्यासोबत आहे, असं म्हणत श्वेताने देवाचे आभार मानले आहे. त्यामुळे सध्या श्वेताच्या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा- रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु असताना ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.