चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहेत. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मंजुरीविना त्यांना देशबाहेर जाता येणार नाही. तसेच आपल्या घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर ९ एप्रिलला सुनावणी होणार होती. मात्र सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे अवधी मागितला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. हा दावा जामीन अर्ज दाखल करताना करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर चाईबासा आणि देवघर प्रकरणात लालू यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

जामीन मिळाल्यानंतर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी आनंद व्यक्त करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. लालू प्रसाद यादव यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd lalu prasad yadav granted bail from ranchi court in fodder scam case rmt
First published on: 17-04-2021 at 15:06 IST