राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये काँग्रेसोबत युती तुटल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, काँग्रेसची आघाडी म्हणजे काय आहे? आम्ही हरण्यासाठी काँग्रेसवर सर्व काही सोडून देतो? डिपॉझिट जप्त करण्यासाठी देतो?

या अगोदर काँग्रेसचे बिहारचे प्रभारी भक्त चरणदास यांनी म्हटले की, त्यांची पार्टी २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४० लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. जर राजद आम्हाला मान नाही देऊ शकत तर मग आम्ही त्यांना कसा सन्मान देणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजद सोबत आघाडी त्यावेळी तुटली जेव्हा त्यांनी काँग्रेसचा पारंपारिक गढ असलेल्या कुशेश्वरस्थान विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राजदने आघाडी धर्माचं पालन केलं नाही. आता आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला पक्ष बळकट करत आहोत आणि सर्व ४० जागांवर निवडणूक लढवणार आहोत. असंही चरणदास यांनी सांगितले.