दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी दोन हल्लेखोरांनी गुंड जितेंद्र गोगी याच्यावर केलेल्या गोळीबारात गोगी ठार झाला. याचवेळी पोलिसांनी प्रत्त्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही मारले गेले. गोगी याच्यावर गोळीबार करणारे वकिलाच्या वेशात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रोहिणी कोर्टरूममध्ये शुक्रवारी झालेल्या धक्कादायक गोळीबारापूर्वी तिहार जेलमध्ये बंद असलेला आणखी एक गुंड फोनवरून लाईव्ह अपडेट घेत होता अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड जितेंद्र मान गोगी आणि वकिलांच्या वेशातले दोन हल्लेखोर मारले गेले होते. गोगी ३० पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणात वॉन्टेड होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. गोगीच्या हत्येमागे त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी टिल्लू ताजपुरीयाचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, टिल्लू राहुल त्यागी आणि जगदीप जग्गा आणि इतर दोन सहभागी हल्लेखोरांच्या सतत संपर्कात होता. टिल्लूकडे एक फोन होता ज्याद्वारे तो कोर्टातल्या हल्लेखोरांच्या संपर्कात होता.

गोगीला ठार मारण्यासाठी पाठवलेल्या दोन्ही हल्लेखोरांकडून टिल्लू मिनिटाला थेट अपडेट घेत होता. तो त्यांना विचारत होता की ते रोहिणी कोर्टापासून किती दूर आहेत आणि ते कधी पोहोचतील. तो विनय आणि उमंग या आणखी दोन साथीदारांच्या संपर्कात होता, ज्यांना आता अटक करण्यात आली आहे. त्याने दोघांना कोर्टात पोहोचून थेट अपडेट देण्यास सांगितले होते.

दोन्ही गोळीबार करणारे आधीच पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात पकडले गेले आहेत आणि हल्ला करत आहेत हे कळल्यावर टिल्लू घाबरला. त्याला कळले की त्याच्या गुंडांना पोलिसांपासून वाचणे आणि फोन कट करणे कठीण होईल. त्यानंतर टिल्लूने त्याच्या इतर दोन लोकांना ताबडतोब बोलवले. ते रोहिणी कोर्टातील पार्किंगमध्ये पोहोचल्याचे कळल्यानंतर टिल्लूने त्यांना पळून जाण्यास सांगितले.

गोगी आणि टिल्लू हे कॉलेज सोडण्यापूर्वी जवळचे मित्र होते आणि खंडणीचे रॅकेट चालवत होते. गेल्या काही दशकांमध्ये या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील गॅंगवॉरमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohini court shootout gangster tillu tajpuriya live updates via internet calling abn
First published on: 27-09-2021 at 17:23 IST