विमानांना अलिकडे झालेल्या अपघातानंतर त्यांची उड्डाणे थांबवण्यात आली असून आता त्यांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी रशियातील दहा तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. हे पथक गेल्या १४ ऑक्टोबरला सुखोई विमानाला झालेल्या अपघाताचीही चौकशी करीत आहे.
विमान उतरताना कुठल्याही संदेशाशिवाय या विमानाचे सीट बाहेर आले होते. यात वैमानिक सुरक्षित राहिले पण विमान मात्र कोसळले होते. रशियन तज्ज्ञ व भारतीय हवाई दलाचे अधिकारी त्याचबरोबर हिंदुस्थान अॅरॉनॉटिक्स लि. या कंपनीचे अधिकारी या विमानांच्या तपासणीत सहभागी आहेत. एकूण २०० विमानांची तपासणी सुरू आहे असे हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर सुखोई विमाने पुन्हा सेवेत दाखल होतील. देशाच्या लढाऊ विमानांच्या एक तृतीयांश विमानांची उड्डाणे आता थांबवण्यात आली आहेत. या विमान अपघातातील एक वैमानिक सुखोई-३० च्या दुसऱ्या अपघाताच्या वेळीही सहभागी होता. २००९ नंतर सुखोई ३० विमानाला पुण्याजवळ पाचवा अपघात झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
सुखोई-३० विमानांच्या तांत्रिक तपासणीसाठी रशियाचे पथक पुण्यात
विमानांना अलिकडे झालेल्या अपघातानंतर त्यांची उड्डाणे थांबवण्यात आली असून आता त्यांची तांत्रिक तपासणी करण्यासाठी रशियातील दहा तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. हे पथक गेल्या १४ ऑक्टोबरला सुखोई विमानाला झालेल्या अपघाताचीही चौकशी करीत आहे.
First published on: 04-11-2014 at 01:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian team in pune for checking sukhoi