Husband Of Russian Woman Found Living In Karnataka : नीना कुटीना हे नाव सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण ही रशियन महिला गोकर्ण येथील जंगलातल्या एका गुहेत तिच्या दोन मुलींसह वास्तव्यास होती. विशेष बाब म्हणजे २०१७ ला तिचा व्हिसा संपला आहे. ती भारतात बेकायदेशीर रित्या राहात होती अशीही माहिती समोर आली आहे. तिला आता रशियात पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान या महिलेचा पार्टनर इस्रायली असल्याची माहिती समोर आली आहे. FRPO ने ही माहिती दिली असून आता त्या व्यावसायिकाचं नाव ड्रोर गोल्डस्टीइन असं आहे. गोल्डस्टीइनने हे सांगितलं की नीनाने त्याला कुठलीही पूर्वकल्पना न देता काही महिन्यांपूर्वी गोवा सोडलं होतं.

काय म्हटलं आहे ड्रोर गोल्डस्टीइनने?

मी आणि नीनाने बारतात सात महिने एकत्र घालवले. त्यानंतर आम्ही युक्रेनला गेलो होतो. त्यानंतर मी प्रेमा आणि अमा या माझ्या दोन मुलींना भेटण्यासाठी भारतात येत होतो. काही महिन्यांपूर्वी नीनाने मला काही न सांगता गोवा सोडलं होतं. त्यानंतर मला नीना आणि माझ्या दोन मुली कुठे आहेत याची काहीही माहिती नव्हती. मी नीना आणि माझ्या दोन मुली हरवल्याची तक्रारही दिली होती. ज्यानंतर त्या गोकर्णमध्ये असल्याची माहिती मला बातम्या पाहून मिळाली असं ड्रोरने म्हटलं आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

मला माझ्या मुलींचा ताबा हवा आहे-ड्रोर

ड्रोर म्हणाला मला किती दिवसांपासून माझ्या मुलींना बघायचं होतं. मला त्या आत्ता दिसल्या. ती मला त्यांच्यासह वेळ घालवू देत नव्हती. मला माझ्या मुलींचा ताबा हवा आहे. मला माझ्या मुली फारच जवळच्या आहेत. मी दर महिन्याला नीनाला पैसे पाठवत होतो. आता या तिघींना रशियात घेऊन जाण्यासाठी FRPO ने मला विनंती केली आहे. मलाही त्यांना तिघींना नेणं थोडं कठीण आहे. काही वर्षांपूर्वी नीनाची आणि ड्रोरची भेट झाली होती. दोघं प्रेमात पडले. गोव्यातच या दोघांना दोन मुली झाल्या.

फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस अर्थात FRRO ने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार नीना कुटीनासह सापडलेल्या दोन मुलींचे वडील म्हणजे इस्रायलचे व्यावसायिक आहेत. इस्रायलचा हा व्यावसायिक बिझनेस व्हिसा घेऊन भारतात आला होता. नीना आणि तिच्या दोन मुलींना रशियात परत पाठवण्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च हा व्यावसायिक करु शकतो का? हे विचारण्यासाठी आम्ही त्याला संपर्क केला होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा व्यावसायिक नीनाला काही वर्षांपूर्वी भेटला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांमध्ये शरीरसंबंधही आले. ज्यानंतर नीनाला दोन मुली झाल्या. नीनाशी प्रेमसंबंध असलेला इस्रायली व्यावसायिक कापडाचा व्यावसायिक आहे. त्याचं नाव ड्रोर असल्याचं त्याने सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीनाने मंगळवारी काय म्हटलं होतं?

“मी आणि माझ्या मुली जंगलात आनंदी होतो. मला आणि माझ्या मुलींना रुग्णालयात आणण्यात आलं आहे. माझ्या दोन लहान मुलींनी पहिल्यांदा डॉक्टर पाहिला आहे. तसंच रुग्णालय पाहण्याचीही ही त्यांची पहिलीच वेळ आहे. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहात होतो, निसर्गाचा आस्वाद घेत होतो. आम्ही काही भुकेने तडफडून मरणार नव्हतो.” असंही नीनाने एएनआयला सांगितलं.