नवी दिल्ली : विरोधकांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांना वेग आला असला तरी, ‘२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल हे आम्हाला माहिती आहे’, अशी खोचक टिप्पणी परराष्ट्र मंत्री एस, जयशंकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी, केंद्रातील भाजपची सत्ता कायम राहील, असा दावा त्यांनी केला.
भारतात निवडणुका होतात, कधी एक पक्ष जिंकतो, कधी दुसरा. भारतात लोकशाही नसती तर सत्ताबदल झालेला दिसला नसता, सर्व निवडणुकांचा निकाल एकसारखाच लागला असता. अर्थात २०२४ चा निकाल तर एकच असेल, आम्हाला तर माहितीच आहे, असे जयशंकर म्हणाले.




काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल ते म्हणाले की, देशांतर्गत राजकारणावर परदेशात जाऊन टीका-टिप्पणी करण्यातून जगभरात राहुल गांधींची विश्वासार्हता वाढेल असे दिसत नाही!
परदेशात जाऊन भारताविरोधात बोलण्याची वाईट सवय राहुल गांधींना जडली आहे. परदेशात जाऊन भाजप सरकारविरोधात टीका केल्यावर विदेशी पाठिंबा मिळेल असे त्यांना वाटते. पण, भारतात भाजपविरोधी राजकारणाचा उपयोग होत नाही.
-एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री